जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज लेवा पाटीदार समाजातर्फे सरदार पटेल यांना अभिवादन करण्यात आले.
आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून लेवा पाटीदार समाज बांधवांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आज सकाळी शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते या रॅलीस हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यानंतर शहरातून रॅली निघाल्यानंतर सरदार पटेल भवन येथे याची सांगता झाली.
सरदार पटेल लेवा भवनातील वल्लभभाईंच्या पुतळ्याला मान्यवरांच्या उपस्थितीत माल्यार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार राजूमामा भोळे, जळगाव पीपल्सचे माजी चेअरमन भालचंद्र पाटील, माजी महापौर जयश्रीताई महाजन, माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी महापौर ललीत कोल्हे, डॉ. केतकीताई पाटील, माजी नगराध्यक्ष बंडूदादा काळे, पियुष कोल्हे, नितीन लढ्ढा, ललीत चौधरी, डॉ. स्नेहल फेगडे आदींसह मान्यवर आणि समाजातील आबालवृध्दांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.