Home Cities जळगाव माळी समाज वधुवर सूचीमध्ये नाव नोंदणीसाठी आवाहन, संकेतस्थळाला सुरुवात

माळी समाज वधुवर सूचीमध्ये नाव नोंदणीसाठी आवाहन, संकेतस्थळाला सुरुवात


परिचय मेळाव्याचे पोस्टर अनावरण उत्साहात 

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । येथील समस्त माळी समाजातर्फे वधूवर सूचित नाव नोंदणी करण्यासाठी व माहिती पाठविण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. डिसेम्बर महिन्यात १० तारखेला जळगावात लेवा भवन येथे माळी समाजाचा राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात सूचीचे प्रकाशन होईल.

माळी समाज राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा २०२३ हा १० डिसेंबर रोजी लेवा भवन येथे होणार आहे. त्यानिमित्त वधूवर परिचय सूची प्रकाशित होणार असून इच्छुक वधू व वरांनी नावे व माहिती ५ डिसेंबर पर्यंत माहिती पाठवायची आहे. नाव नोंदणीची माहिती malibandhan.com या संकेतस्थळावर किंवा ८२६१९८७१९३ व ७५८८८१३१६७ वर पाठवायची आहे. माहिती सिद्धेशा एनर्जी, नूतन महाविद्यालयजवळ येथेही देता येणार आहे. सदर संकेतस्थळ हे बुधवारी १८ ऑक्टोबर रोजीपासून संध्याकाळी सुरु करण्यात आले आहे.

माळी समाज राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळाव्याचे पोस्टर अनावरण नुकतेच करण्यात आले. यावेळी उद्योजक रितेश माळी, माळी बंधन संकेतस्थळाचे संचालक प्रशांत महाजन, उद्योजक संतोष इंगळे, नंदू पाटील, गोकुळ महाजन, विवेक महाजन, संकेत चौधरी, रोहित महाजन आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound