जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नवीपेठेतील मार्तंड फोटो स्टुडिओ हे दुकान अज्ञात चोरट्याने फोडून ३२ हजार रूपये किंमतीच ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, सतीश सुधाकर जगताप (वय-५८ रा.समर्थ कॉलनी, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे नवीपेठ येथे मार्तंड फोटो स्टुडीओचे दुकान आहे. फोटोग्राफी करून आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी १७ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे स्टुडीओ दुकान बंद करून घरी निघून गेले होते. दरम्यान, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी स्टुडीओ दुकान फोडून ३२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीला आला. यानंतर सतीष जगताप यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रफुल्ल धांडे करीत आहे.