जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील स्मशानभूमीच्या आवारात आनाधिकृतरित्या रस्त्यावर अतिक्रमण काढण्याबाबत तक्रारदार गोविंदा धनाजी महाले
व दीपक जाधव यांनी ग्रामविकास व पंचायत राज विभाग राज्याचे मंत्रालयात तक्रारी अर्ज केले आहे. अतिक्रमण केलेल्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आले आहे .
या याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे गेल्या सात ते आठ वर्षांपासून धोबी समाज व समस्त समाज बांधव यांच्या स्मशानभूमीच्या अवातरा अनधिकृत अतिक्रमण केलेले आहे.युनूस रज्जाक बागवान (वय-४८) रा. पिंपळगाव हरेश्वर तालुका पाचोरा हा पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामपंचायत सदस्याचा माजी ग्रामपंचायत सदस्य आहे. याने दादागिरी करून दिवसेंदिवस अतिक्रमण स्मशानभूमीच्या आवारात व रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमांच्या विळखा करून ठेवला आहे, तसेच स्मशानभूमी मृतदेह जाण्यासाठी जात असताना देखील त्यांनी विरोध केला आहे. तसेच ही स्मशानभूमी नसून माझ्या गुराढोरांना बांधण्यासाठी गोठयाची जागा असल्याचे सांगून या ठिकाणी प्रेत जाळून नये अशी धमकी दिली व समाज बांधवांना शिवीगाळ केले. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रारी व निवेदन देऊन देखील याबाबत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच आपण कायद्या जाणत असल्याचे दाखवून दिले आहे एका विशिष्ट समाजाला आपण काय चीज आहे? तुम्ही कितीही अर्ज फाटे केले तरीही देखील दोन समाजात जातीय दंगल घडवून आनेल अशी धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे समाज बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे या गावातील स्मशानभूमीवरील अतिक्रमण येत्या १५ दिवसात काढण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची असताना देखील ग्रामपंचायत इकडून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळेच धोबी समाज बांधवांमध्ये नाराजीचा सुर व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात शासन नियमानुसार तात्काळ घोषित करावे, कारण अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करावा असे आदेश करत यावे, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आलेले आहे