Home क्राईम भोकर नदीतुन अवैध गौण खनिज वाहतूक; तहसीलदारांनी लक्ष देण्याची मागणी

भोकर नदीतुन अवैध गौण खनिज वाहतूक; तहसीलदारांनी लक्ष देण्याची मागणी


 

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |


पुनखेडा-पातोंडी भोकर नदीपात्रातुन रात्रीच्या वेळी जेसीबीने साहायाने उत्खनन करून मोठ्या प्रमाणात ट्रेक्टर द्वारे अवैध गौणखनिज वाहतूक होत असून याकडे तहसीलदार बंडू कापसे यांनी लक्ष देण्याची सर्वसाधारण जनतेतुन होत आहे.

या बाबत वृत्त असे की आज मध्यरात्री पुनखेडा पातोंडी नदीपात्रातुन मोठ्या प्रमाणात आज रात्री मोठ्या प्रमाणात नदीपात्रातुन खरवा वाहतूक करण्यात आली. विशेष म्हणजे ही सर्व वाहतूक रात्री बारा ते पाचच्या दरम्यान करण्यात आले.

सुमारे दहा ट्रक्टरांनी न्यायालयाच्या बाजूला एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात भराव भरण्यात आला.रात्रीच्या अंधरात एका-मागे-एक अशी सुमारे शंभरच्या वर अवैध भराव करण्यात आला विशेष म्हणजे हे सर्व विनापरवाने वाहतुक करण्यात आले.याकडे तहसीलदार बंडू कापसे यांनी लक्ष देण्याची मागणी जनतेतुन होत आहे.


Protected Content

Play sound