जखमी झालेल्या विवाहितेला शेजारी राहणाऱ्या नागरीकांच्या मदतीने जिल्हा रूग्णालयात केले दाखल
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात राहणाऱ्या परिवारात स्वयंपाक करण्याच्या वादातून पतीकडून पत्नीवर विळ्याने वार करून जखमी केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, सुभाष शंकर उमाळे (वय-४०) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव हे आपल्या पत्नी मंगला उमाळे (वय-३४) यांच्यासोबत वस्तव्याला आहे. शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मंगला उमाळे या महिला कामावरून घरी आल्या. त्यावेळी तिचे पती सुभाष उमाळे याने स्वयंपाक करण्यास सांगितला. दरम्यान मी आता कामावरून आली आहे. थोड्यावेळाने स्वयंपाक करते असे पत्नी मंगला यांनी सांगितले. याचा राग आल्याने सुभाष उमाळे याने हाता विळा घेवून पत्नी मंगला यांच्या उजव्या कानावर वार करत जखमी केले. हा प्रकार घडल्यानंतर मंगला उमाळे यांना शेजारी राहणाऱ्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती सुभाष शंकर उमाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील करीत आहे.



