अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अल्पवयीन मुलीला सायकलवर बसवून टेकडीवर नेत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, अमळनेर तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ती अमळनेर येथील शाळेत शिक्षण घेत असल्याने तिच्या गावापासून ते अमळनेर शहरापर्यंत बसने प्रवास करत असते. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता पिडीत मुलगी ही अमळनेर बसस्थानकात बसची वाट बघत असतांना तिच्या ओळखीचे साहिल आणि भुऱ्या या दोन जणांनी तिला सायकलवर बसवून पिरबाबा टेकडीजवळ घेवून गेले. त्याठिकाणी एकांतात तिच्याशी अंगलट करून तिचा विनयभंग केला. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर पिडीत अल्पवयीन मुलीने नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी साहित आणि भुऱ्या (पुर्ण नाव माहित नाही) या दोघांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहे.