चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गोवंशाच्या जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणार्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना चाळीसगांव शहरातील हुडको कॉलनी व नागदरोड परिसरात मांसासाठी गोवंश जातीच्या जनावरांचा कत्तलीसाठी वापर होतो याबाबत संशय होता. म्हणुन सदर परिसरात रात्रौच्या वेळी सतर्कतेने गस्त करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सुचना देण्यात आल्या होत्या. आज दिनांक ०८ रोजी पहाटे ०४.०० वाजेच्या सुमारास पोउनि/योगेश माळी, पोहेकॉ/नितीन वाल्हे, पोना/महेंद्र पाटील, पोशि/रविंद्र बच्छे, ज्ञानेश्वर गिते, ज्ञानेश्वर पाटोळे, पवन पाटील, भरत गोराळकर असे शासकीय वाहनाने गस्त करीत होते.
याप्रसंगी चाळीसगांव शहरातील सदानंद हॉटेल जवळ दोन संशयीत इसम एका मोटारसायकलवर एका पिशवीत काहीतरी घेवुन जातांना दिसल्याने त्यांच्यावर संशय बळावल्याने त्यांना पोलीसांनी थांबविण्याचा इशारा केला असता ते पळुन जात असतांना त्यांचा पोलीसांनी पाठलाग करुन इसम नामे शेख अनिस शेख गफुर कुरेशी ( वय ४८ रा. उर्दु बालवाडीचे पाठीमागे मोहम्मदीया मशिद समोर इस्लामपुरा चाळीसगाव) आणि मुस्ताक खान हारुण खान कसाई ( वय ४० रा. अमोल बुट हाउसच्या बाजुला रथगल्ली, कसाईवाडा चाळीसगाव ) यांना छाजेड आँईल मील जवळ पकडले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील पिशवीमध्ये एक लहान लाकडी दांड्याची लोखंडी धारदार कुर्हाड, दोन लोखंडी धारदार सुरे व धार लावण्याची गोलाकार लांब कानस मिळुन आली.
या वस्तुबाबत विचारपुस करता त्यांनी सांगितले कि, इसम नामे शेख अनिस शेख गफुर याचे घराजवळ असलेल्या त्याचे गोठ्यात गोवंश जातीचे जनावराची कत्तल करण्यासाठी जात असल्याचे माहीती दिली. लागलीच सदरची माहीती पोलीस निरीक्षक, संदिप पाटील, सपोनि/सागर ढिकले यांना कळवुन, ते हजर होताच दोन पंचासमक्ष एकुण ४५,०००/- रुपये किमती ०४ गोवंश जातीचे जनावरे व ४८,०००/- रुपये किमतीचा गोवंश कत्तल करण्यासाठी लागणारा इतर मुद्देमाल असा एकुण ९३,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल सदर ठिकाणावरुन जप्त करुन, नमुद इसमांविरुध्द चाळीसगांव शहर पो.स्टे. गु.र.नं. ४४५/२०२३ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५, ११ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(ल) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील आरोपीतांना ताब्यात घेवुन, ताब्यात घेण्यात आलेली गोवंश जनावरे ही गोशाळेत जमा करण्यात आलेली आहेत.
वरिल कार्यवाही पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, संदीप पाटील, तसेच सपोनि/सागर ढिकले, पोउपनि योगेश माळी, पोहेकॉ/नितीन वाल्हे, पोना/महेंद्र पाटील, रविंद्र बच्छे, ज्ञानेश्वर गिते, ज्ञानेश्वर पाटोळे, पवन पाटील, भरत गोराळकर सर्व. नेम चाळीसगांव शहर पो.स्टे. यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोना/महेंद्र पाटील नेम. चाळीसगांव शहर पो.स्टे. हे करीत आहेत.