चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील चहार्डी येथील ४ कोटी ५५ लाख खर्चाच्या व सर्व सुविधांनी युक्त असलेल्या नूतन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भुमीपूजन अरुणभाई गुजराथी यांच्याहस्ते आज करण्यात आले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान व जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत चहार्डी येथे ४ कोटी ५५ लाख खर्चाच्या अद्यावत व सुसज्ज सर्व सुविधायुक्त असलेल्या नूतन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे आज भुमीपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना अरुणभाई गुजराथी म्हणाले की, विकासाला कधीही स्वल्पविराम नसतो.उर्वरित कालावधीत चांगली विकास कामे करा सुशिक्षित लोकप्रतिनिधी मिळत नाहीत फार मोठे काम म्हणून चहार्डीची पाणी समस्या सोडविण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच जिल्हा परिषद सदस्या प्रा. निलम पाटील यांचेही त्यांनी कौतुक केले. ते म्हणाले की, जिल्हा नियोजन मंडळ म्हणजे जिल्हा परिषदेची छोटी विधानसभा आहे त्यातून विरोधी पक्षात राहून एव्हढा निधी आणणे कठीण असते परंतु जिल्हा परिषद सदस्या प्रा.निलम पाटील या सक्षम लोकप्रतिनिधी असून त्यांनी विरोधी पक्षात राहून देखील मतदार संघाच्या विकासासाठी भरपूर निधी खेचून आणला ही बाब निश्चितच भूषणावह आहे.
यावेळी माजी आमदार जगदीश वळवी म्हणाले की.सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे ग्रामीण भागातील आरोग्यचा प्रश्न सुटणार आहे.ग्रामीण भागात शस्त्रक्रिया गृह,चांगल्या सोयी सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर सोय करावी,तज्ज्ञ मधून ही चांगला तज्ञ असा ही फरक आहे.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार जगदीश वळवी, माजी आमदार दिलीपराव सोनवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी,संचालक नेमीचंद जैन, पंचायत समितीचे माजी सभापती डी. पी. साळुंखे, जळगावचे माजी महापौर किशोर पाटील, गटनेते जीवन चौधरी, बाजार समितीचे माजी सभापती गिरीश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव रायसिंग, बाजार समिती उपसभापती नंदकिशोर पाटील, संचालक कांतीलाल पाटील,शेतकी संघाचे अध्यक्ष शेखर पाटील, गटविकास अधिकारी बी.एस. कोसोदे, चहार्डीच्या सरपंच श्रीमती उषाबाई पाटील, पंचायत समिती सदस्या मालुबाई कोळी, कल्पनाबाई पाटील, पाटील,बाजार समिती संचालक धनंजय पाटील, रामलाल कंखरे, भरत पाटील तसेच आशिष गुजराथी, नगरसेवक हितेंद्र देशमुख,रमेश शिंदे, कैलास सोनवणे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल वाघ, राष्ट्रवादी शहराध्यक्ष धर्मेंद्र मगरे,यशवंत पाटील,युवा कार्यकर्ते,सनी सचदेव,नवमान काझी, प्रफुल्ल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते
याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी शासनाकडून ४ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी मिळाला.तसेच पाणी टंचाईच्या काळात चार कूपनलिका मंजूर केल्या त्याबद्दल जि.प.सदस्या प्रा.डॉ.निलम पाटील यांचा धनराज बडगे व चहार्डी वासीयांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच श्रीमती उषाबाई पाटील, ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम कोळी यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्हा परिषद सदस्या प्रा.डॉ.निलम पाटील यांनी केले. सुत्रसंचलन चंद्रकांत पाटील,तर आभार संजीव सोनवणे यांनी व्यक्त केले. यशस्वीते साठी ग्रामपंचायत सदस्य जगदीश पाटील,सुतगिरणीचे संचालक समाधान पाटील,प्रा.एस.टी.पाटील सर, शिवाजी सोसायटीचे चेअरमन दिनकर पाटील, तसेच वसंत पाटील, ललित पाटील,सुनील पाटील,विनोद पाटील व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचार्यांनी सहकार्य केले.