मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील खडसे महाविद्यालयात नुकतेच राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो. याप्रसंगी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. हेमंत महाजन यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण करून केले.
यावेळी प्राचार्य डॉ. महाजन यांनी मेजर ध्यानचंद यांचा जीवनपट विद्यार्थ्यांच्या समोर उलगडला व खेळाचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्व विशद करून सांगितले. तत्पूर्वी सर्व विद्यार्थी व उपस्थित प्राध्यापकांनी स्वस्थ भारत प्रतिज्ञा सामूहिक रित्या घेतली यातून फिट इंडिया संकल्पनेला चालना मिळण्यासाठी समाजात काम करण्याचे आवाहन यावेळी क्रीडा विभागाकडून करण्यात आले. प्रतिज्ञाचे वाचन कु.शाहिस्ता पिंजारी हिने केले. या कार्यक्रमात रिले स्पर्धा व मनोरंजनात्मक बोगी शर्यत अशा स्पर्धांचे विद्यार्थ्यांच्या विविध गटात आयोजन करण्यात आले होते. विविध संघांना खेळाडूंची नावे देण्यात आली होती अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मुलांनी खेळाचा आनंद लुटला. विजयी संघाचे यावेळी बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले. या स्पर्धांचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा.डॉ. आ.टी चौधरी यांनी मैदानाचे पूजन व नारळ वाढवून केले .यावेळी त्यांच्या समवेत प्रा. पी .पी.लढे, प्रा. डॉ.संजीव साळवे प्रा. डी आर कोळी ,प्रा. थोरात सर तसेच राष्ट्रीय खेळाडू गणेश घटे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. डॉ. प्रतिभा ढाके (क्रीडा संचालक )यांनी केले सदर कार्यक्रमास यशवंत सुरवाडे, अमोल गुंजाळ, निखिल घटे, मनीषा गरुडे ,निकिता बोदडे व इतर खेळाडूंनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला.