भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव येथील दलित समाजातील तरुणांना कबूतरे व शेळी चोरण्याचा संशयावरून जातीयवादी गाव गुंडांनी अमानुषपणे मारहाण केल्या प्रकरणी रिपाइं आठवले गटाच्या वतीने जाहीर निषेध करून भडगाव येथील तहसिलदार मुकेश हिवाळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले.
हरेगाव येथील जातीयवादी गाव गुंड नाना गलांडे, मनोज बोडके, दिपक गायकवाड, दुर्गेश वैद्य, राजु बोरने यांनी दलित समाजातील तरुणांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या घटनेचा भडगाव तालुका रिपाई आठवले गटाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. अश्या गुंड प्रवृत्तीच्या गावगुंड यांचा त्वरित बंदोबस्त करावा व त्यांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
पुरोगामी म्हटल्या जाणार्या महाराष्ट्र राज्यात अश्या प्रकारच्या घटना सातत्याने घडत असल्याने आंबेडकर समाजातील घटकात प्रचंड प्रमाणात चीड निर्माण झाली आहे. झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करून निवेदन देण्यात आले. निवेदनावर तालुकाध्यक्ष एस.डी.खेडकर, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक खरे, मातंग आघाडीचे आण्णा साठे, ईश्वर बावीस्कर, सुधाकर दोंदे, कामगार आघाडीचे परमेश्वर सुर्यवंशी, देवा बावीस्कर, गुरुदास भालेराव, बाळासाहेब पाटील, शिवाजी पाटील, किसन मोरे, सुधाकर सोनावणे, प्रकाश सुर्यवंशी, भारत धोबी, सागर भोई, भाऊसाहेब सुर्यवंशी, परशुराम सुर्यवंशी, बाळू निकम, सचिन बागूल, कांतीलाल मोरे, प्रीतम सोनवणे, निंबा ब्राह्मणे, शुभम खेडकर, प्रदीप खैरे, महेंद्र सरदार, रवी सुर्यवंशी, संतोष सॅन दाणे, नंदू सरदार, विनोद खेडकर, धोंडू राखूदे, राजू फासगे, दगडू गायकवाड, तुकाराम मोरे, नाना पैठणकर, संजय मोहिते, कैलाश मोरे, पिया राखंऊडे, ईश्वर राखूनदे, भारत धोबी, सुखदेव सोनवणे, भाऊसाहेब केदार, अनिल केदार, अजित बावीस्कर, चंद्रमनी सोनावणे, संभाजी मोरे, भगवान खेडकर, गौतम खेडकर, अनिल जगताप, आनंद साठे, अजय निकम , प्रदीप सोनवणे, यांच्या सह कार्यकर्ते पदाधिकारी मोठया प्रमाणावर हजर होते..