Home Cities चोपडा चोपडा महाविद्यालयातील खेळाडूंचे राष्ट्रीय स्पर्धेत यश

चोपडा महाविद्यालयातील खेळाडूंचे राष्ट्रीय स्पर्धेत यश

0
53
chopda college students

chopda college students

चोपडा प्रतिनिधी । नुकत्याच झालेल्या जुनियर व सिनियर राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेमध्ये येथील महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सात सुवर्ण पदके मिळविले.

उत्तराखंडमधील डेहरादून येथे ही स्पर्धा नुकतीच पार पडली. त्यात वृषाली ठाकरे,साक्षी बाविस्कर, पूजा वाघ, धनश्री बिरारी, शीतल पाटील, कल्याणी पाटील, यश पाटील, स्वप्नील पालिवाल, धीरज पाटील यांच्या चमून यश संपादन केले. सर्व विजयी खेळाडूंचे संस्थेच्या उपाध्यक्षा आशाताई विजय पाटील ,सचिव डॉ. स्मिताताई पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी. ए.सूर्यवंशी उपप्राचार्य डॉ. ए. एल. चौधरी, डॉ. के. एन. सोनवणे क्रीडा संचालिका सौ. क्रांती क्षीरसागर व इतर मान्यवर उपस्थित होते. या सर्वांना प्रशिक्षक भुपेंद्र पोळ यांचे मार्गदर्शन तर आर. एच.पाटिल व एस. एच.बाविस्कर यांचे सहकार्य लाभले.


Protected Content

Play sound