मोबाईल दुकानातून विक्रेत्याचा महागडा मोबाईल लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमधील मोबाईल दुकानाच्या काऊंटरवरून एकाचा ४५ हजार रूपये‍ किंमतीचा महागडा मोबाईल चोरून नेल्याची घटना २५ मार्च रोजी दुपारी घडली होती. या घटनेनंतर पाच महिन्यांनी शनिवारी १९ ऑगसट रोजी दुपारी  शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील गोलाणी मार्केट मध्ये कुणाल विजय रावलानी (वय-४२) रा. गणेश नगर, जळगाव यांचे व्हिकेज मोबाईल नावाचे दुकान आहे. मोबाईल विक्री व दुरूस्तीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. २५ मार्च २०२३ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आश्चर्य सचन रा. कानपूर, उत्तरप्रदेश याने काऊंटरवर ठेवलेला ४५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल हातचालाखीने चोरून नेला. दरम्यान, मोबाईल चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मोबाईलचा सर्वत्र शोध घेतला  परंतू काहीही माहिती मिळाली नाही. अखेर तांत्रिक मदतीच्या आधारे हा मोबाईल आश्चर्य सचन यानेच चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पाच महिन्यानंतर शनिवारी १९ ऑगस्ट रोजी मोबाईल विक्रेता कुणाल रावलानी यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्ररीवरून संशयित आरोपी आश्चर्य सचन याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गजानन बडगुजर करीत आहे.

Protected Content