चाळीसगाव-लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी| चाळीसगाव तालुक्याचे विद्यमान आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या वाढदिवशी ह.भ.प निवृत्तीनाथ महाराज इंदुरीकर यांचा भव्य कार्यक्रमाचे आयोजन उपसभापती साहेबराव राठोड यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
दरवर्षी आमदार मंगेश दादा चव्हाण यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या दिवशी रक्तदान, वृक्षारोपण, किर्तन व इतर सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदाचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा होणार आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला २१ ऑगस्टला ह.भ.प निवृत्तीनाथ महाराज इंदुरीकर यांचा भव्य कार्यक्रमाचे आयोजन तालुक्यातील तळोंदे येथील अग्नीदेवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत करण्यात आले आहे.
चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित उपसभापती साहेबराव बाबु राठोड यांच्या तर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ८ ते १० वाजेच्या दरम्यान हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला स्वतः आमदार मंगेश दादा चव्हाण हे सपत्नीक उपस्थिती लावणार आहे. यामुळे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावण्याचे आवाहन उपसभापती साहेबराव राठोड यांनी केले आहे.