Home Cities अमळनेर विहिरीत पडलेल्या तरूणाचा मृतदेह सापडला

विहिरीत पडलेल्या तरूणाचा मृतदेह सापडला

0
103

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यात विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरूणांचा मृतदेह एसडीआरएफ पथकाने चार तासांच्या अथक प्रयत्नांनी शोधून काढला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत शोध व बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

पारोळा येथील वंजारी शिवारालगत रहिवाशी असलेले विनोद धोत्रे यांचा चिरंजीव शुभम धोत्रे (वय १७) हा शिक्षणाकामी अमळनेर येथे राहत होता. प्रताप महाविद्यालय इयत्ता ११ वीत शिक्षण घेत होता. त्याच्यासोबत चार पाच मित्रांसह तो विहिरीत पोहायला गेला होता. विहीरीत उडी मारल्यावर तो वर आला नाही. मुलांनी आरडाओरड केल्यानंतर ही घटना स्थानिकांनी तात्काळ मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या कानावर टाकली.

मंत्री ना. अनिल पाटील यांनी रेल्वे प्रवासात सायंकाळी साडेसहा वाजता जिल्हाधिकारी व एसडीआरफचे राज्य संचालक यांना मदत व बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले होते. एमडीआरएफ ने स्थानिक आदिवासींच्या तरूणांच्या मदतीनं मृतदेह शोधून काढला आहे. पुनवर्सन मंत्र्यांनी तरुणांच्या कुटुंबाचे दूरध्वनीवरून सांत्वन केले आहे. या संदर्भातील वृत्त जिल्हा माहिती कार्यालयाने दिले आहे.


Protected Content

Play sound