Home प्रशासन तहसील अपहाराची चौकशी करा : शेखर पाटील यांच्यासह ग्रामस्थांचे उपोषण

अपहाराची चौकशी करा : शेखर पाटील यांच्यासह ग्रामस्थांचे उपोषण


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सावखेडासीम ग्रामपंचायतीतल्या अपहाराची चौकशी करावी या मागणीसाठी पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले असून आज याचा तिसरा दिवस आहे.

 

यावल तालुक्यातील सावखेडासिम येथील ग्रामपंचायतीस सन २०२० पासून आलेल्या विविध निधी अंतर्गत आलेली अनियमिता  व अपहार केल्याच्या तक्रारी गेल्या दहा महिन्यात वेळो वेळी करून ही त्या संदर्भातील अद्याप पर्यंत चौकशी होत नसल्याने येथील पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील व त्यांच्या सोबत सावखेडासिम गावाचे  ग्रामस्थांनी दिनांक १४ ऑगस्ट पासून यावल पंचायत समिती समोर आपले आमरण उपोषणास सुरू केले आहे.

 

सावखेडासीम येथील  ग्रामसेवकावर निलंबनाची आणी ग्रामपंचायतच्या अपहार संबधीतांवर गुन्हे दाखल झाल्या शिवाय माघार नाही असा पवित्रा शेखर पाटील यांनी घेतला असुन उपोषणास्थळी रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या रोहिणी खडसे खेवलकर यांच्यासह जिल्हा परिषदचे माजी गटनेते प्रभाकर सोनवणे यांनी भेट दिली व कारवाई होण्या संदर्भात लक्ष घातले असुनआज उपोषणाचा तिसरा दिवस आहे.

 

यावल तालुक्यातील,सावखेडासिम येथील ग्रामपंचायतीस आलेल्या वेगवेगळ्या निधीचा अनियमित उपयोग तसेच निधीचा अपहार करण्यात आल्याची तक्रार पंचायत समितीचे कॉंग्रेसचे माजी गटनेते शेखर पाटील यांनी येथील गटविकास अधिकारी यांचे कडे १४ ऑगस्ट पासून ग्रामस्थांसह मागण्या मान्य होईस्तोवर उपोषण सुरू राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर. आज आज उपोषणाचा तिसरा दिवस असुन ,काही उपोषणकत्यार्ंची प्रकृती खालवली असुन उपोषणाच्या ठिकाणी यावल ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी भेट देवुन उपोषणकर्त्यांची आरोग्यची तपासणी केली.

 

उपोषणास बसलेल्या शेखर पाटील यांनी या प्रमुख मागण्यांकडे पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधले असुन, यात ग्रामपंचायत सावखेडा येथील सन २०२० पासून तर आज पर्यंत आलेल्या पंधराव्या वित्त आयोगातील कामाचे अनियमित टेंडर व अनियमित कामांची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करणे , तसेच ग्रामनिधी पाणीपुरवठा निधी मध्ये झालेल्या अपहारास कारणीभूत असलेल्यां वर तात्काळ कार्यवाही करणे, त्याचप्रमाणे एकाच ठेकेदारास बेकायदेशीर कामे दिल्याने दोषी असलेल्या ग्रामसेवकास निलंबित करण्यात यावे अशा मागण्यांचा समावेश आहे.

 

शेखर पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास सावखेडासिम ग्रामपंचायतच्या सदस्य सौ वर्षा अजय पाटील ,नसीमा फारूक तडवी,रहीमान रमजान तडवी सलीम मुसा तडवी ,विनायक धना पाटील, शाहरूख राजु तडवी , निखिल खुशाल पाटील,समीर जुम्मा तडवी,दगेखा सिकंदर तडवी,भिकारी कालु तडवी  यांनी ही उपोषणात सहभाग घेतला असुन ,यावलचे प्रभारी माजी नगराध्यक्ष राकेश कोलते, मारूळ चे सरपंच सैय्यद असद जावेद अली,उमेश जावळे, कॉंग्रेस कमेटीच्या अनुसुचित जाती विभागाचे तालुका अध्यक्ष अनिल जंजाळे, कॉंग्रेसचे यावल शहराध्यक्ष कदीर खान ,युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष पवन पाटील आदीनी आपला पाठींबा दिला आहे.


Protected Content

Play sound