फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण रुग्णालय, न्हावी व धनाजी नाना महाविद्यालयाच्या इंटरनल कॉलिटी ॲशुरन्स सेल (आय क्यू ए सी ), विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिवसानिमित्त महा-युवासंवाद एचआयव्ही / एड्स बाबत जनजागृती करण्यात आली. यात पुण्यातील बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सार्वजनिक आरोग्य विभाग व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय युवा दिवस राज्यस्तरीय ऑनलाईन उद्घाटन समारंभाचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करतांना प्रभारी प्राचार्य डॉ.ए.आय. भंगाळे यांनी सांगितले की, सद्यस्थितीत अवघ्या विश्वाला सतावणाऱ्या एड्स आजाराला रोखण्याची शक्ती युवाचैतन्यात असून भारत अवघ्या विश्वाच्या दृष्टीने युवा देश असल्याने हीच युवा चैतन्य शक्ती एड्स सारख्या आजाराला नियंत्रणात आणेल मात्र त्यासाठी तरुणांनी स्वतःला व्यसनांपासून दूर ठेवले पाहिजे असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ ए आय भंगाळे, श्री मनोज चव्हाण समुपदेशक आयसीटीसी सेंटर ग्रामीण रुग्णालय, न्हावी, श्री विनायक किरंगे डाटा एन्ट्री ऑपरेटर ग्रामीण रुग्णालय न्हावी, प्रा डॉ शरद बिऱ्हाडे, प्रा डॉ दीपक सूर्यवंशी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षाचे आंतरराष्ट्रीय युवा दिनाची थीम तरुणांसाठी हरितक्रांती : जगाच्या शाश्वत विकासासाठी हरितक्रांती तरुणांची असे असून युवावर्ग एच आय व्ही / एड्स संदर्भात अधिक संवेदनशील व सृजनशील असल्याने युवा वर्गामध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयात रेड रिबन क्लब ची स्थापना करून जनमानसात जनजागृती करण्याचा संकल्प सोडण्यात आला.
याप्रसंगी बोलताना प्रभारी प्राचार्य डॉ ए आय भंगाळे यांनी उपस्थित युवक- युवतींना उद्देशून सांगितले की, भारतीय युवांच्या कार्य कुशलतेमुळेच आपण जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होण्यासाठी मार्गक्रमण करीत असतानाच जीवनाला उध्वस्त करणाऱ्या व्यसनांपासून स्वतःला लांब ठेवून परिवार व समाजातील विविध घटकांना व्यसनाच्या विनाशक परिणामांची जाणीवजागृती करण्याचे उत्तरदायित्व प्रत्येकाने स्वीकारले पाहिजे आणि तसे झाल्यास येणाऱ्या काळात भारत अवघ्या विश्वात अग्रभागी असेल असा विश्वास दर्शविला. यावेळी श्री मनोज चव्हाण यांनी एड्स आजाराविषयी मूलभूत माहिती, आजाराची कारणे, आजारापासून स्वतःला वाचवण्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजेत व समाजाच्या अंतिम घटकापर्यंत जाणीवजागृती करण्यासाठी काय करता येणे शक्य आहे याविषयी सविस्तर विवेचन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ राजेंद्र ठाकरे, डॉ विजय सोंजे, विद्यार्थी विकास अधिकारी, डॉ हरीश नेमाडे समन्वयक, आय क्यू ए सी, डॉ हरीश तळेले, श्री शेखर महाजन, हर्षल राणे, सिनियर अंडर ऑफिसर गणेश चव्हाण, अजय चौधरी, अशपाक शेख , मयूर श्रीखंडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले