अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नांद्री येथे केंद्र सरकारच्या उपक्रमाच्या अंतर्गत शीळा फलक पूजन करण्यात आले.
केंद्र सरकारने मेरी माटी मेरा देश अभियान सुरू केले असून याच्या अंतर्गत विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने अमळनेर तालुक्यातील नांद्री येथे वृक्षारोपणासह शीळा फलक पूजन करण्यात आले. याप्रसंगी माजी सैनिकांचा सत्कार देखील करण्यात आला.
या कार्यक्रमाला मधुकर कुमावत, संजय ठाकरे, रेशमाबाई ठाकरे, ज्ञानेश्वर माळी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसह गावातील मान्यवरांची उपस्थिती होती.