Home Cities धरणगाव गोंडगाव अत्याचार प्रकरणातील अटकेतील आरोपीला फाशीची शिक्षा करा; टायगर गृपचे धरणगाव पोलीसांना...

गोंडगाव अत्याचार प्रकरणातील अटकेतील आरोपीला फाशीची शिक्षा करा; टायगर गृपचे धरणगाव पोलीसांना निवेदन


धरणगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी ।  भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या अटकेतील आरोपीला फाशीची शिक्षा करावी या मागणीचे निवेदन शहरातील टायगर गृप धरणगावच्या वतीने  गुरूवार १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलीसांना देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील अल्पवयीन मुलीवर गावात राहणारा सोन्या उर्फ स्वप्निल पाटील याने तिच्यावर अत्याचार करून खून केल्याची घटना घडली होती. ही घटना मनवाला काळीमा फासणारी घटना आहे. खून करणाऱ्या सोन्या उर्फ स्वप्निल पाटील यांला अटक करण्यात आले आहे. त्याने खुनाची कबुली देखील दिली आहे. त्यामुळे अटकेतील आरोपीवर जलद गतीने खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा करावी व पिडीत कुटुंबाला न्याय देण्यात यावा, अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा टायगर गृप धरणगावच्या वतीने  गुरूवार १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता देण्यात आलेल्या निवेदनातून केला आहे.

याप्रसंगी टायगर गृप धरणगाव तालुकाध्यक्ष कल्पेश कोळी, चेतन पाटील, शहेबाज शाह, भुषण महाजन, कृष्णा सुतार, राज शिरसाठ, प्रमोद जयराज, प्रशांत पाटील, शुभम चौधरी, शेख वसीम शेख सईद, गणेश आहिरे, किसन राठोड, गोपाल कुराडे, विजय मोहिते, तेजस पाटील, प्रकाश मोहिते, धिरज कोळी, रितेश शिंदे, मयुर पाटील, हर्षल पाटील, भुषण पाटील, वाल्मीक गुंजाळ, अनुप गोपाल आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound