धरणगावात आदिवासी बांधवांचा भव्य मिरवणूक

धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने बुधवार ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी धरणगाव तालुक्यातील आदिवासी विविध संघटनांच्या वतीने शहरातून पारंपारिक पद्धतीने वेशभूषा व वाद्यचे सादरीकरण करत भव्य धरणगाव शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील हाता कमान धरून नृत्य सादर केल्याचे पहायाला मिळाले.

 

जळगाव जिल्ह्यात क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने धरणगाव तालुक्यात देखील आदिवासी बांधवांच्या विविध संघटनाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांनी आपल्या पारंपारिक वेशभूषा आणि पारंपारिक वाद्यचे सादरीकरण करत आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. या अनुषंगाने धरणगाव शहरातील गौशाळा येथून भव्य मिरवणुकीला बुधवारी ९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी सुरुवात झाली. ही मिरवणूक हनुमान नग, मराठे गल्ली, धरणी चौक, कोट बाजार, तेली तलाव मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात या मिरवणूकीची सांगता करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिरवणूक दाखल होताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी समाज बांधवांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच आदिवासी बांधवांचे पारंपारिक पद्धतीने असलेले धनुष्य हातात घेऊन आदिवासी बांधवांसोबत नृत्य सादर केल्याचे पहायला मिळाले.

Protected Content