Home Cities यावल अत्याचारास बळी पडलेल्या चिमुकलीला सर्वधर्मीयच्या वतीने श्रध्दांजली

अत्याचारास बळी पडलेल्या चिमुकलीला सर्वधर्मीयच्या वतीने श्रध्दांजली


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथे विविध सामाजिक संघटना आणी नागरीकांच्या वतीने भडगाव तालुक्यातील गोंदेगावची लहान चिमुकलीवर एका नराधमाने केलेल्या तिच्यावरील अत्याचार व तिचा अत्यंत निघृणपणे खुन केल्याच्या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येवून सर्वधर्मीयच्या वतीने चिमकुलीला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

 

संपुर्ण महाराष्ट्र राज्याला हादरून सोडणाऱ्या व माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोंदेगाव तालुका भडगाव येथील नऊ वर्षीय चिमुकलीवर गावातील एका नराधमाने आदी तिच्यावर अमानुषरित्या अत्याचार केले व नंतर तिचा निघुर्णपणे खुन केल्याची अत्यंत दुखदायी व समाजमनाला सुन्न करणारी घटना घडली आहे.  या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करून त्या नराधमास कठोर शासन व्हावे अशी मागणी केली. यावेळी किनगाव गावातील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरातील भवानी माता मंदीरात हिंदवी स्वराज्य सेना व ग्रामविकास संघटना यांच्यासह समस्त सर्वधर्मीय समाज बांधवांच्या वतीने अत्याचारास बळी पडलेल्या त्या ९ वर्षाच्या  चिमुकलीस कॅन्डील पेटवुन सर्वधर्मीय श्रद्धांजली अर्पण करण्यात येवुन या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आले.  या गुन्ह्यातील आरोपीस कठोर शासन व्हावे अशी मागणी करण्यात आली.

 

याप्रसंगी पुरूजीत चौधरी ,राहुल पाटील ,मोहन पाटील , अनिल मराठे, रोहीत मराठे, योगेश पाटील , संजय वराडे, मुन्ना सैय्यद , गुड्र कुरेशी, बाबा कुरेशी , समीर शेख , सुभाष पाटील , उदय पाटील , सुदर्शन पाटील , गौरव कोळी , दिपक चौहान , प्रज्वल बारी , आर ई पाटील , संभाजी पालवे, पंकज हिवराळे यांच्यासह मोठया संख्येत महिला भगिनी उपस्थित होत्या.


Protected Content

Play sound