जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसी परिसरातील राम दालमील कंपनीसमोर पार्कींगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भूषण पाटील ह आपल्या परिवारासह जुने जळगाव परिसरात वास्तव्याला आहे. ते एमआयडीसीतील राम दालमील कंपनीत नोकरीला आहे. २९ जुलै रोजी भूषण पाटील हे दुचाकी (एमएच १९ डीवाय ८४९०) ने कंपनीत कामावर आले. त्यावेळी त्यांनी त्यांची दुचाकी कंपनीच्या पार्कींगमध्ये लावली. दुपारी ३ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने पार्कींगमधून दुचाकी चोरून नेली. ही घटना घडल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला असता दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर त्यांची पत्नी सरला भूषण पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवार २ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर पाटील करीत आहे.