Home Cities जामनेर संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी जामनेरात भव्य मोर्चा

संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी जामनेरात भव्य मोर्चा

0
43


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबत आक्षेपार्य विधान केल्याच्या निषेधार्थ जामनेर तालुका क्षत्रिय माळी समाज तर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी जामनेर नगरपालिका चौकात संभाजी भिडे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

 

या मोर्चात सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून संभाजी भिडे यांचा निषेध मोर्चा जामनेर शहरातून करण्यात आला. यावेळी नगरपालिका चौकामध्ये संभाजी भिडे यांच्या पुतळ्याचे जाण्यात आला आणि तहसीलदार नानासाहेब आगळे यांना लेखी निवेदन देऊन संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी डॉक्टर प्रशांत पाटील, चंद्रकांत बाविस्कर, एडवोकेट ज्ञानेश्वर बोरसे, अतिश झाल्टे, रवींद्र झाल्टे, मुलचंद नाईक, शंकर राजपूत, राहुल चव्हाण, अशोक नेरकर, संतोष झाल्टे यांच्यासह क्षत्रिय माळी समाज पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound