Home Cities जळगाव केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे अपघातातून सुदैवाने बचावले

केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे अपघातातून सुदैवाने बचावले

0
123

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे हे नशिराबाद जवळ झालेल्या कार अपघातातून सुदैवाने बचावले आहेत.

जळगाव जिल्हा केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे हे आपल्या संघटनेतील सहकार्‍यांसह भुसावळ कडून जळगावकडे येत होते. राष्ट्रीय महामार्गावर नशिराबाद येथील उड्डाणपुलाच्या जवळ त्यांच्या चारचाकी वाहनाचे टायर अचानक फुटले. यामुळे त्यांची कार उलटली. या अपघातात सुदैवाने त्यांना इजा झाली नाही. याप्रसंगी त्यांच्या सोबत अनिल झंवर, सुनील मालू आदी सहकारी देखील होते. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. यात ड्रायव्हरसह यातून प्रवास करणार्‍यांना किरकोळ जखमा झाल्या.

दरम्यान, सुनील भंगाळे यांच्या वाहनाला अपघात झाल्याचे वृत्त येताच अनेक मान्यवरांची त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. सुनीलभाऊ हे शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर विष्णू भंगाळे यांचे बंधू असून राज्य केमिस्ट असोसिएशनमधील मातब्बर व्यक्तीमत्व म्हणून ख्यात आहेत.


Protected Content

Play sound