Home Cities रावेर सुकी नदीत एक जण बेपत्ता; एसडीआरएफचे पथक घेतेय शोध

सुकी नदीत एक जण बेपत्ता; एसडीआरएफचे पथक घेतेय शोध

0
26
( Image Credit Source : Live Trends News )

रावेर-शालीक महाजन | रावेर शहरासह तालुक्याला पुन्हा एकदा अतिवृष्टीचा फटका बसला असून सुकी नदीच्या पात्रातून एक तरूण बेपत्ता झाला असून याचा एसडीआरएफची टिम शोध घेत असल्याचे वृत्त आहे.

( Image Credit Source : Live Trends News )

रावेर तालुक्यात सकाळ पासुन संततधार पाऊस कोसळत आहे. यातच सुकी नदीत रझोदा येथील एक जण वाहून गेल्याची माहीती समोर येथे आहे.तहसिलदार बंडू कापसे घटनास्थळी दाखल झाले असुन बेपत्ता झालेल्या युवकाचा एसडीआरएफ मार्फत शोध सुरु आहे.

रावेर तालुक्यातील रोझोदा येथील रवींद्र दगडू चौधरी हा तरूण गारबर्डी धरण परिसरामध्ये काल सायंकाळी पोहायला गेला होता.पोहत असतांना अचानक तो नदी पात्रात बेपत्ता झाला.घटनेची माहीती तहसिलदार बंडू कापसे यांना मिळताच एसडीआरएफच्या टीमसह घटनास्थळी पोहचले असुन बेपत्ता झालेल्या युवकाचा शोध सुरु आहे. सुकी नदीला दोन्ही काठ भरून पाणी वाहत असुन यात बेपत्ता युवकाचा एसडीआरएफची टीम शोध मोहीम राबवित आहेत. तर आज सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा एकदा तालुक्यात मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.


Protected Content

Play sound