यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील हिंगोणा येथे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात अटल भूजल योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेच्या मूल्यांकनाबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात येत असलेल्या भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे मूल्यांकन करण्यात आले.
या बैठकीत सदर मूल्यांकन दरम्यान पुढील बाबीवर गुणांकन करण्यात आले.
प्राथमिक तयारी लोकसहभाग व जनजागृती करणे आणि गाव शिवारातील भूजला बाबतची माहिती संकलित करणे. लोकसभागातून पाण्याचा ताळेबंद जलसुरक्षा आराखडा व पीक नियोजन तयार करणे.
समाविष्ट योजनांचे अभिसरण साध्य करणे. पाणी बचतीच्या उपाययोजना राबविणे. नाविन्यपूर्ण उपक्रम गावात राबविणे पाऊस पाणी मोजमाप व भूजल पातळी नोंदि विषयक निरीक्षणे. फलनिष्पत्ती पारदर्शकता जाहीर प्रकटन या प्रमुख मुद्दयावर चर्चा करून पाहणी करण्यात आले.
सदर भूजल समृद्ध ग्रामस्पर्धेचे मूल्यांकन जिल्हा स्तरीय समिती मार्फत करण्यात येत आहे.
सदर बैठकीला जिल्हा समिती चे सचिव वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा चे नितिन दहिकर व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी भदाणे तसेच जिल्हा जलसंधारण विभाग जळगावचे जितेंद्र विसपुते व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जळगाव चे कनिष्ठ भूवैज्ञानिक विजयंत जैन व कृषी विभाग चे मंडळ अधिकारी यावल चे खैरनार इतर कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष चे कृषी तज्ञ दीपक कंरकाळ व जलसंधारण तज्ञ धनंजय पॊल व आशाकिरण (DIP) जळगाव चे भूवैज्ञानिक आशिष भवाने व IEC तज्ञ रियाज तडवी समुदाय संघटक तस्लीम तडवी व किरण तावडे उपस्थित होते.
सदर बैठकीला गावाचे प्रथम नागरिक ग्रामपंचायत चे सरपंच रुकसाना फिरोज तडवी व ग्रामसेवक गणेश सुरळकर व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ व भूजल मित्र मोठया संख्येत उपस्थित होते.