जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गार्डन डेव्हलपींगसाठी झाडे पाठवितो असे सांगत तरुणाकडून आरटीजीएस करुन घेत २५ लाख रुपये उकळून घेतले. त्यानंतर ऑर्डर पाठविण्यास टाळाटाळ करुन तरुणाची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शनिवारी रामानंद नगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील विद्युत कॉलनीत दीपक बळीराम चौधरी हे वास्तव्यास असून त्यांचा गार्डन डेव्हलपींगचा व्यवसाय आहे. त्यासाठी त्यांना विविध प्रकारचे झाडे लागत असल्याने गेल्यावर्षी दि. ५ जानेवारी २०२२ मध्ये त्यांनी शंकर गवळा रा. चित्रदुर्ग कर्नटक यांच्यासोबत संपर्क साधला होता. त्यांनी मला गार्डन डेव्हलपींगसाठी लागणाऱ्या झाडांबाबत सांगितले असता, शंकर गवळा यांनी त्यांना सागवान व इतर झाडे घेण्यासाठी चित्रदुर्ग येथे बोलावून घेतले. त्यानुसार दीपक चौधरी यांनी तेथे जावून सुमारे दीडलाख रुपयांचे रोखीने झाडे खरेदी केली होती. त्यानंतर चौधरी यांना पुन्हा झाडे लागत असल्यांनी त्यांनी शंकर गवळा यांच्याशी सपर्क साधून झाडांबाबत सांगितले. त्यानुसार दीपक चौधरी यांनी शंकर गवळा यांच्या बँक खात्यावर आरटीजीएस पद्धतीने १५ लाख रुपये पाठविले. त्यानंतर वेळोवही चौधरी यांचा संपुर्ण विश्वास संपादन करीत त्यांच्याकडून उर्वरीत दहा लाख रुपये चौधरी यांनी दोन वेळेस शंकर गवळा याच्या बँक खात्यावर पाठविले.
तीन वेळा सुमारे २५ लाख रुपये पाठवून देखील समोरील व्यक्ती झाडे पाठवित नव्हती. आपली फसवणुक झाल्याचे समजल्यानंतर दीपक चौधरी यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार शंकर गवळा रा. चित्रदुर्ग राज्य कर्नाटक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.