पाचोरा – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नांद्रा येथील जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना पहुरच्या जैन बांधवांकडून आज वह्यांचे वाटप करण्यात आले.
नांद्रा येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पहुर येथील जैन बांधवांकडून एकेरी, दुरेघी, चारेघी, बॉक्स एकूण चार प्रकारच्या वह्यांचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांद्रा येथे झालेल्या कार्यक्रमात संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचे पूजन महिला भजनी मंडळाच्या जेष्ठ सदस्या गं. भा. वैजंताबाई सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रशांत बेदमुथा, योगेश बेदमुथा, दिनेश बेदमुथा, दीपश्री साखला, शितल चोरडिया, उज्वल सिसोदिया, पुजा लोढा, महावीर छाजेड, राखी प्रितेश लोढा, दर्शना बेदमुथा यांच्या सौजन्याने वह्यांचे वाटप ग. भा. वैजतांबाई सुर्यवंशी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष स्वप्निल बाविस्कर, सदस्य भिकन पाटील, राकेश साळवे, योगेश सुर्यवंशी, किशोर पाटील, सोपान पाटील, सागर तावडे, पत्रकार राजेंद्र पाटील, गजानन ठाकूर, पोलिस पाटील किरण तावडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले.
दरम्यान मागील वर्षीही त्यांनी नांद्रा शाळेत शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले होते. वह्या मिळाल्या नंतर लहान बालकांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो ना तो आनंद कुठे ही पहावयास मिळत नाही. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो व ईश्वराने आपल्याला देणारे बनवले आहे यातच समाधान आहे. वह्यांचे वाटप करताना मनस्वी आनंद मिळतो. असे त्यांनी मत व्यक्त केले.
यावेळी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक राजेंद्र गोसावी, जेष्ठ शिक्षक देविदास पवार, सचिन जोशी, स्मृती साबळे, प्रतिभा पाटील, विद्या जोशी यांनी त्यांचे शाळेतील विद्यार्थ्यांना लेखन साहित्य दिल्याबद्दल आभार मानले. तसेच महेश गवांदे, प्रशांत जैन यांचे ऋणी राहु व एक चांगला मित्र मिळल्याचे समाधान व्यक्त केले. प्रशांत जैन यांनी यापुढे शैक्षणिक क्षेत्रात अशीच मदत करत राहु असे आश्वासन दिले. सूत्रसंचलन सचिन जोशी यांनी तर उपस्थितांचे आभार देवीदास पवार यांनी मानले.