Home धर्म-समाज सचिन परदेशी यांना भडगावात निरोप

सचिन परदेशी यांना भडगावात निरोप


भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पदोन्नतीमुळे शिक्षणाधिकारी पदावर रूजू होणारे येथील गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांना समारंभपूर्वक निरोप देण्यात आला.

 

भडगाव तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या व तालुक्यातील सर्व माध्य आणि उच्च माध्यमिक शाळांच्या वतीने आदर्श कन्या विद्यालय भडगाव या ठिकाणी गटशिक्षणाधिकारी सचीन परदेशी यांचा पदोन्नतीने जि प जळगाव या ठिकाणी,उपशिक्षणाधिकारी शिक्षण विभाग माध्य.या पदावर बदली झाल्या बद्दल निरोप व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलाहोता.

 

याप्रसंगी सत्कार मूर्ती सचिन परदेशी; जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी उपाध्यक्ष आर. डी. निकम ,भडगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष एस. टी. पाटील, तालुका संघाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी आणि  मुख्याध्यापक व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हजर होते. यावेळी मुख्याध्यापक कृष्णा पाटील यांनी सूत्र संचालन केले तसेच दिपक बोरसे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व कार्यक्रमाचे अध्यक्ष एस टी आण्णा आणि प्रमुख पाहुणे आर डी नाना यांनी मनोगतात सचिन परदेशी यांना शुभेच्छा दिल्या.

 

तसेच सत्काराला उत्तर देतांना सचिन परदेशी यांनी आपल्या तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांचे सहकार्याबद्दल आभार मानून धन्यवाद दिलेत ,शेवटी आदर्श कन्या विद्यालयाचे प्राचार्य श्री रोकडे सर यांनी मनोगत व्यक्त करून आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली .


Protected Content

Play sound