महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे वाहनधारकांची डोकेदुखी

WhatsApp Image 2019 06 11 at 3.07.29 PM

जळगाव (प्रतिनिधी) शाहूनगरमध्ये नाले सफाई केल्यानंतर जमा झालेला मैंला हा महापालिकेतर्फे उचलण्यात न आल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाला असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

 

शिवाजीनगर उड्डाणपूल पाडल्यानंतर या पुलावरून होणारी वाहतूक ही भोईटे नगर गेट, बजरंग विस्तारित बोगदा या मार्गाने होत आहे. याकडे जाताना खानदेश कॉम्प्लेक्स शेजारून शाहूनगरमधून वाहनधारकांना जावे लागते. या रस्त्यावर असलेल्या गटारीतील मैला काढल्यानंतर महापालिकेने तो तात्काळ न उचलल्याने वाहनधारकांना कसरत करून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या एका बाजूला गटारीचा मैला पडून आहे तर दुसर्‍या बाजूला बांधकामासाठी आणलेली वाळू पडलेली आहे. अशा परिस्थितीत दुचाकीस्वार तसेच चारचाकीवाहनधारक , रिक्षाचालक यांना मार्ग काढावा लागत आहे. दोघा बाजूला रस्ता अरुंद झाल्याने वाहनधारकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. गटारी शेजारी काढलेल्या मैल्यात वाहनाचे चाक अडकल्याने वाहनधारकांची तारांबळ उडत आहे. या सर्व प्रकाराबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नगरसेवक याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप केला आहे.

Protected Content