ना थका हू, ना हारा हू : पवारांचा पुन्हा पावसातून एल्गार !

येवला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शरद पवार यांच्या सातारा येथील गाजलेल्या पावसातील भाषणानंतर आज पुन्हा त्यांचा येवला येथील भिजलेला फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

 

आज शरद पवार यांनी नाशिक दौर्‍याची सुरूवात केली. नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर ते येवला येथे रवाना झाले. दरम्यान आज सुप्रीया सुळे यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. यात पावसात भिजलेले शरद पवार हे कारमध्ये बसलेले दिसून येत आहेत. या फोटोला सुप्रीयाताईंनी  ”भाग गए रणछोड़ सभी, देख अभी तक खड़ा हूँ मैं |ना थका हूँ ना हारा हूँ, रण में अटल तक खडा हूँ मैं ॥” असे कॅप्शन दिले आहे. हा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला असून यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत.

 

हाच फोटो जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शेअर केला आहे. अजित पवार यांनी पक्षात फूट पाडल्यानंतर शरद पवार यांनी राज्यभरात सभा घेणार असल्याची घोषणा केली होती. याचा प्रारंभ त्यांनी नाशिक जिल्ह्यातून केली आहे. यानंतर ते क्रमाक्रमाने राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील सभा घेणार आहेत.

Protected Content