Home धर्म-समाज यावल वकील संघाची कार्यकारिणी जाहीर

यावल वकील संघाची कार्यकारिणी जाहीर

0
86


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील वकील संघाची वार्षीक सर्वसाधारण बैठक संपन्न झाली असून यात संघाच्या नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे. यात अध्यक्षपदी ॲड. एस आर लोंढे यांची तर सचिवपदी ॲड. याकुब तडवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

यावल येथे नुकतेच यावल वकील संघाची सर्वसाधारण वार्षिक बैठक संपन्न होवुन यात संघाच्या नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. यात संघाच्या अध्यक्षपदी ॲड. एस आर लोंढे यांची तर सचिवपदी ॲड. याकुब ए तडवी यांची व ग्रंथपालपदी ॲड. आकाश चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या बैठकीस माजी अध्यक्ष ॲड. निलेश मोरे तथा कार्यकारणी सदस्य ॲड. एस.जी. कवडीवाले , ॲड. राजेश पी गडे, ॲड. के डी पाटील, ॲड. नितिन एम चौधरी, ॲड. अजय एम कुलकर्णी, ॲड. अशोक आर सुरळकर , ॲड. गोविंद एम बारी, ॲड. खालीद ए शेख, ॲड. उमेश सी बडगुजर, ॲड. मोहीत शेख, ॲड. देवेन्द्र आर बाविस्कर, ॲड. रियाज पटेल , ॲड. धिरज चौधरी , ॲड. सुलताना आर तडवी, ॲड. राजेश बारी , ॲड. विनोद एम परतणे , अँड शेखर तडवी, ॲड. गौरव पाटील, ॲड. भुषण महाजन आदी उपस्थित होते . या प्रसंगी नुतन कार्यकारणीतील बिनविरोध निवड झालेल्या पदाधिकारी यांचे स्वागत सत्कार करण्यात आले


Protected Content

Play sound