पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी तालुक्यातील देवगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
तालुक्यातील देवगांव येथे सद्यस्थितीत आरोग्य केंद्र नसल्याने येथील रूग्णांना उपचारासाठी तामसवाडी येथे जावे लागत होते. यात प्रामुख्याने गरोदर महीला, अतिदक्षतेचे रूग्ण यांची उपचारासाठी मोठी गैरसोय होत होती. देवगांव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे व केंद्राचा माध्यमाने देवगांवसह सभोवतालील गावांना जवळच उपचार घेता यावे यासाठी आमदार चिमणराव पाटील हे प्रयत्नशिल होते. या प्रयत्नांचे फलीत म्हणून येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे.
या देवगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे सभोवतील एकुण १७ गावांना याचा लाभ होणार आहे. यापुर्वी गरोदर असो वा अतिदक्षतेचा रूग्ण यांना वेळे वाहन उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे वाहन मिळाल्यावर उपचारासाठी तामसवाडी येथे जाण्या-येण्यात वेळ जात होता. या प्रक्रीयेमुळे अनेक रूग्ण हे दगावले देखील आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने खुप मोठी गैरसोय ही रूग्णांची होत होती. त्याची आमदार चिमणराव पाटील यांनी दखल घेत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचेकडे पाठपुरावा करित होते. या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असुन शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडुन देवगांव प्राथमिक केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे.
यामुळे देवगांवसह अन्य १७ गावांचा वैद्यकीय उपचाराबाबत मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच या प्राथमिक आरोग्य केंद्राचा मंजुरीसाठी आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. तानाजी सावंत व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.