Home Cities पाचोरा तारखेडा खुर्द ग्रामपंचायत सरपंचपदी संगिता पाटील बिनविरोध

तारखेडा खुर्द ग्रामपंचायत सरपंचपदी संगिता पाटील बिनविरोध

0
42


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील तारखेडा खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्री राखीव जागेची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. यात संगिता राजेंद्र पाटील यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

 

याप्रसंगी तारखेडा खुर्द ग्रामपंचायत सदस्य मधुकर दौलत पाटील, सुनिल जुंदाल पाटील, सुनिल रमेश सोनवणे, देविदास कौतिक पाटील, आशाबाई रोहिदास मराठे, मा. उपसरपंच संतोष गना पाटील, पॅनल प्रमुख दिलीप भगतराव पाटील, गावचे तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग मुकुंदा पाटील, सरपंचपती राजेंद्र एकनाथ पाटील हे उपस्थित होते. सदर कामी निवडणूक निर्णय अधिकारी बी.आर. पाटील यांनी कामकाज पाहिले तर यावेळी ग्रामसेवक समाधान पाटील, तलाठी प्रिती नरेंद्रसिंग पाटील यांनी सहकार्य केले.


Protected Content

Play sound