वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकाला अटक, वाहनही केले जप्त

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रोहनवाडी परिसरातून बेकायदेशीररित्या वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांनी कारवाई केली असून ट्रॅक्टर चालकाला अटक केली आहे. याबाबत गुरुवार २९ जून रोजी दुपारी २ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव तालुक्यातील आव्हाना रोडवरील रोहनवाडी परिसरातून अवैधरित्या गिरणा नदीतून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक आप्पासो पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी त्यांच्या पथकांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने गुरुवार २९ जून रोजी सकाळी ९ वाजता रोहनवाडी परिसरात कारवाई करत ट्रॅक्टर चालक विकी मच्छिंद्र सोनवणे (वय-२४, रा. खेडी ता.जि.जळगाव) याला ताब्यात घेतले. वाळू वाहतुकीबाबत कोणत्याही परवाना नसल्यामुळे वाळूने भरलेले  ट्रॅक्टर देखील जप्त करण्यात आले. या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल अभिषेक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी २ वाजता चालक विकी मच्छिंद्र सोनवणे आणि ट्रॅक्टरचे मालक या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ गायकवाड करीत आहे.

Protected Content