Home Cities जळगाव उद्योजक प्रमोद अत्तरदे यांचा उद्या गोदावरी अभियांत्रीकीत सत्कार

उद्योजक प्रमोद अत्तरदे यांचा उद्या गोदावरी अभियांत्रीकीत सत्कार

0
107


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मूळचे जळगावकर पण सध्या अमेरिकेतील उद्योजक प्रमोद अत्तरदे यांचे अमेरिकेतील रोजगार संधी व नवीन तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन व त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्काराचे आयोजन उद्यो गोदावरी अभियांत्रीकीत करण्यात आले आहे.

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रमोद अत्तरदे (उद्योजक व कॉर्पोरेटर एडिसन महानगरपालिका न्यू जर्सी, अमेरिका) यांचा सत्कार सोहळा दिनांक २८ जून रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. प्रमोद अत्तरदे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन सकल लेवा पाटीदार मंडळे, जळगाव शहर यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

प्रमोद उत्तरदे हे एक उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहे. अमेरिकेमध्ये उद्योग धंद्यांना असलेले अनुकूल वातावरण तसेच बदलत्या काळानुसार तेथील रोजगार संधी, तिथे येणारे तंत्रज्ञान, जागतिक बाजारपेठ, भारतातील सद्यस्थिती आणि त्याचे सामाजिक पडसाद या विषयांवर ते मार्गदर्शन करणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्यनेे उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे होणार्‍या या सत्कार समारंभाला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री निळकंठ फालक (माजी आमदार भुसावळ) तसेच गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हासदादा पाटील हे उपस्थित राहणार आहेत.


Protected Content

Play sound