पीआरपीतर्फे सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी ‘जेल भरो’ आंदोलन ( व्हिडीओ )

bhusawal aandolan

भुसावळ प्रतिनिधी । पीआरपी पक्षातर्फे भुसावळकरांना सुरळीतपणे पाणी पुरवठा करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी आज ‘जेल भरो’ आंदोलन करण्यात आले.

पीपल्स रिपब्लीकन पक्षाचे नेते जगन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज विविध मागण्यांसाठी जेल भरो आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी जगन सोनवणे यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, की सध्या भुसावळकरांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. अगदी हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. यामुळे शहरातील नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. यासोबत स्थानिक नागरिकांना रोजगार आणि शेतकर्‍यांच्या मालास योग्य तो भाव मिळावा अशा मागणीसाठी पीआरपी आणि अन्य १० संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आजचे आंदोलन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, या मागण्यांचे निराकरण न करण्यात आल्यास उद्या भुसावळ येथे रेल्वे रोको करून या आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येणार असल्याचा इशारासुध्दा जगन सोनवणे यांनी याप्रसंगी दिला.

या आहेत मागण्या

याप्रसंगी जगन सोनवणे यांनी खालील मागण्यांचे निवेदन दिले.

* भुसावळ शहर व ग्रामीण जनता यांचे हंडाभर पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहे. भुसावळकरांना पाणी विकत घ्यावे लागत आहे आणि पाणी टँकर भ्रष्टाचार सुरु आहे. भुसावळकरांचे पाणी प्रश्‍न सोडविण्यास नापास सत्ताधारी आमदार, नगराध्यक्ष हेच जबाबदार आहेत त्यांनी नैतिक दृष्टया राजीनामा द्यावा.
* आपली तापी नदी जवळ असतांनाही सत्ताधारी राज्यकर्त्यांना पाण्याचे नियोजन करता आलेले नाही.
रस्ते तयार होताच काहीच दिवसांनी उखडले गेले आहेत याला विकास म्हणत नाही तर भ्रष्टाचार म्हणतात.
आजी-माजी आमदारांचे भांडण जिवनभर संपणार नाही, त्यांचे दलाल व चमचे, नगरसेवक व कार्यकर्ते यांचेही स्वार्थ मरेपर्यत संपणार नाही, जनता या सर्वांना कंटाळली आहे. जनतेला परिवर्तन हवे आहे.
शेतकरी दुष्काळाने हैराण आहे. बेरोजगार हाताला काम नाही. महिलांना घरोघरी उद्योग नाही. रेल्वे अप्रेंटीस धारक यांना तातडीने रेल्वेत सामावून घ्या.
* रोजगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प कर्मचारी, शिक्षक यांना नई दिल्ली श्रम शक्ती भवन यांनी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प नियमित करण्याचे आदेश दि. २७ ऑक्टोबर २०१७ च्या पत्रानुसार दिला असून दि ३१ मार्च २०२० पर्यंत सदरील प्रकल्प नियमित करण्याचे आदेश असतांना देखील जळगाव जिल्हाधिकारी यांनी २७ मे २०१९ नुसार काढलेले आदेश पत्र पुर्णपणे कायदेशीर आहे. हा आदेश तातडीने रदद् करावा.
* विज ग्राहक यांच्याकडून विज वितरण कंपनी जास्त बील आकारते ही पिळवणूक व शोषण थांबलेच पाहीजे.
* डॉ. पायल तडवी घ्या मारेकर्‍यांना फाशी घ्या. मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षण लागू करा. कोळी, ठाकूर यांना एस.टी चे प्रमाणपत्र घ्या. ओबीसीची जाती निहाय जनगणना करा. विधान सभेच्या निवडणूकीत महाराष्ट्रात व जळगाव जिल्हात आणि भुसावळ विधानसभा मतदार संघात इव्हीएम हटवा व बॅलेस पेपरने मतदान घ्या.
*दिपनगर येथील कंत्राटी कामगार यांची वेतन वाढ करा, आणि कायम करा, भविष्यात संच क्र ३ बंद पडल्यास सर्वांना कायम करा व दिपनगरचा ६६० चा मेगॉवॉट प्रकल्प गाजावाजा झाला पण काम संथगतीने सुरु आहे., युध्द स्तरावर जलदगतीने काम पुर्ण करा.
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोह आर. पी. डी. भुसावळ येथील दुकानदारांचा होणारा छळ थांबलाच पाहीजे. रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी धारक यांना ७/१२ चा उतारा मिळालाच पाहीजे. फैजपुर येथील समाजसेवक आरिफभाई शेख यांना राजकीय दबावखाली हद्दपार करण्याचा कुटील डाव आहे. हा प्रस्ताव तातडीने रद्द झालाच पाहीजे हा अन्याय आम्ही कदापी सहन करणार नाही. रिक्षा चालक मालक यांचा त्रास थांबलाच पाहीजे.

पहा : जगन सोनवणे यांची आंदोलनाबाबतची भूमिका.

Add Comment

Protected Content