पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा रेल्वे स्थानका नजीक रेल्वे कि. मी. खंबा क्रं ३७३/९/११ जवळ (पी. जे. रेल्वे लाईन जवळ) कोणत्यातरी धावत्या प्रवाशी रेल्वेतून पडल्याने एका ३० वर्षीय (अंदाजित वय) इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २१ जुन रोजी उघडकीस आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस नाईक दिनेश पाटील हे रुग्णवाहिका चालक बबलु मराठे यांच्यासह घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा पंचनामा करुन रुग्णवाहिका चालक बबलु मराठे यांच्या मदतीने मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मयताचे अंदाजे वय ३० वर्ष असुन उंची ५ फुट ८ इंच, रंग – गौरा, शरीर बांधा – मध्यम, केस काळे, उजव्या हाताच्या पोटरीवर जय भिम असे गोंधलेले, अंगावर पांढऱ्या रंगाचे फुल बाहीचे शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, लाल रंगाचे सॅन्डो बनियान आढळुन आले असुन घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मयताची ओळख पटविण्याचे काम चाळीसगाव लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे पी. एस. आय. किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस नाईक दिनेश पाटील हे करीत आहे. मयत इसमाबाबत कोणास काहीही माहिती असल्यास त्यांनी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात ९८२३५१३३५६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन तपासी पोलिस नाईक दिनेश पाटील यांनी केले आहे.