Home क्राईम जामनेर तालुक्यातील एका गावातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

जामनेर तालुक्यातील एका गावातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण


पहूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एकाच गावात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे. या संदर्भात पहुर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पहूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात दोन १७ वर्षीय अल्पवयीन मुली शेजारी शेजारी राहतात. दरम्यान गावातील राहणारा तुषार अलाउद्दीन तडवी याने या दोन्ही मुलींना काहीतरी  फूस लावून अपहरण करून पळवून नेल्याची घटना घडली. हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलींच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, परंतु त्या कुठेही मिळून आल्या नाही, अखेर शनिवारी १७ जून रोजी रात्री १० वाजता पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी तुषार अल्लाउद्दीन तडवी याच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत लिंगायत करीत आहे.


Protected Content

Play sound