नवीन जाहिरात देऊन शिंदे गटाचा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काल शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे व पंतप्रधान मोदी या दोघांच्याच फोटोंची जाहिरात दिल्यामुळे उडालेले गोंधळ निस्तरण्यासाठी आज शिंदे गटाने नवीन जाहिरात दिली आहे.

 

काल शिवसेनेतर्फे राज्यातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रांना दिलेली जाहिरात वादाच्या भोवर्‍यात सापडली होती. या जाहिरातीत फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच छायाचित्र असल्यानेही आरोप प्रत्यारोप झाले. यातून विरोधकांनी सरकारवर टिका केली. तर सत्ताधारी दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्येही वाद झडल्याचे दिसून आले. तर, काल रात्री उशिरा शंभूराज देसाई यांनी छापून आलेल्या जाहिरातीचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही असे स्पष्ट केले होते.

 

दरम्यान, यानंतर  डॅमेज कंट्रोल करण्याकरता आज पुन्हा अनेक वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली आहे. ‘जनतेच्या चरणी माथा, गर्जा महाराष्ट्र माझा’च्या जाहिरातीच्या माध्यमातून दोन्ही गटांमध्ये सलोखा असल्याचा संदेश देण्यात आला आहे.

Protected Content