रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संपूर्ण परिसराचे लक्ष लागून असलेल्या रावेर पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची आज झालेल्या मतमोजणी लोकमान्य पॅनला सात मिळून बहुमत मिळाले तर सहकार पनलला सहा जागा मिळाल्या.
येथील रावेर पिपल्स को-आपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी ६१.६८ टक्के मतदान झाले होते. लोकमान्य पनल आणि सहकार पॅनलमध्ये अतिशय अटीतटीची निवडणुक झाली.
आज येथील कमलाबाई एस. अग्रवाल गर्ल्स हायस्कूलच्या जिमखाना हॉलमध्ये निवडणुक निर्णय अधिकारी विजयसिंह गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मतमोजणी पर्यवेक्षक प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी आठ सुरुवात वाजता झाली. सुरुवातीला मतपत्रिकांचे मतदार संघनिहाय वर्गीकरण करून गठ्ठे करण्यात आले. तेरा टेबलावर मतमोजणी कर्मचार्यांनी मतमोजणी केली. यानंतर सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला.
विजयी उमेदवार पुढील प्रमाणे आहेत.
सर्वसाधारण मतदार संघात प्रल्हाद रामदास महाजन ( २१८८),मानस अरुण कुलकर्णी (१७९५), राजेंद्र पंढरीनाथ चौधरी (१७७१), पंकज राजीव पाटील (१७२५), सोपान बाबुराव पाटील (१९६५), सोपान साहेबराव पाटील (१८३७), संजय गंगाधर वाणी(१७९४), राजेश सुधाकर शिंदे (१७१६),महिला राखीव मतदार संघात – पुष्पाबाई गणेश महाजन (१८९७), मिराबाई चंपालाल राऊत (१८३५),इतर मागासवर्ग मतदार संघातील दिलीप हिरामण पाटील (२१३५) ,विमुक्त जाती जमाती भटक्या जमाती मतदार संघात अँड.प्रविण सुपडू पाचपोहे (२१७२), अनुसूचित जाती जमाती मतदार संघात विनोद नारायण तायडे (१९१७) हे विजयी झाले.
–
चोख बंदोबस्त
पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सचिन नवले, मनोहर जाधव, राजेंद्र करोडपती का.पुरषोत्तम पाटील आणि सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.