यावल- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वढोदा गावाचे सुपुत्र तसेच सामाजीक कार्यकर्ते नरेंद्र दयाराम सोनवणे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
तालुक्यातील वढोदा गावातील रहिवासी असणारे नरेंद्र सोनवणे विरावली विकास सोसायटीचे विद्यमान व्हा चेअरमन देखील आहेत. मात्र त्यांची जिल्हाउपाध्यक्षपदी वर्णी लागल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तत्पूर्वी जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र नाना पाटील यांच्याकडून त्यांना नियुक्तीपत्र प्राप्त झाले आहे.
या निवडीबाबत पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, विधानसभेचे क्षेत्र प्रमुख अनिल साठे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष ॲड. देवकांत पाटील , राष्ट्रवादी जिल्ह्या उपाध्यक्ष दीपक नागो पाटील , रोहन महजन तालुका उपाध्यक्ष पवन पाटील, समन्वयक किशोर माळी, जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे, गिरीश पाटील, संजय पाटील ,लीलाधर सोनवणे, सुनील सोनवणे, राजू सोनवणे,भाऊडू पाटील , नरेंद्र कोळी , योगेश पाटील , आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.