शिंदेंनी नव्हे तर अमित शहांनी फोडली शिवसेना ! : राऊतांना दावा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकनाथ शिंदे यांनी नव्हे तर अमित शाह यांनी शिवसेना फोडली असल्याचा दावा करत खासदार संजय राऊत यांनी आज नव्याने टिकास्त्र सोडले आहे.

 

आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलतांना शिवसेनेतल्या फुटीवर नव्याने भाष्य केले आहे. ते म्हणाले की, शिवसेना एकनाथ शिंदेंनी नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी फोडली आहे. भविष्यात ते शिंदे गटालाही नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. अमित शहांचे हेच राजकारण आहे, अशी टीका   संजय राऊत यांनी केली. भाजपनेच हा पक्ष फोडला आहे. हा त्यांनी घेतलेला सूड आहे, एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काहीही ताकद नव्हती. ते फारतर ७-८ लोक घेऊन जाऊ शकत होते. त्यांची क्षमता तेवढीच होती. बाकी आमदार केंद्रीय सत्तेचा दुरुपयोग, निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था त्यांच्या टाचेखाली असल्याने गेले, असंही संजय राऊत म्हणाले.

 

खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, शिवसेना फोडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर, पैसा, दहशत अशी सर्व हत्यारे अमित शहांनी वापरली.  एकनाथ शिंदेंना देखील ईडीची भीती होती. ते आदित्य ठाकरेंसमोर रडले होते. त्यांनी मन खंबीर ठेवावे, असे आमचे म्हणणे होते. मात्र, ते दबावाला बळी पडले, असंही संजय राऊत म्हणाले.

Protected Content