जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज । शहरातील गुजराल पेट्रोलपंप पसिरातील एका मेडीकल समोरुन दुचाकी लांबविल्याच्या घटनेप्रकरणी सोमवार, ५ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील जिल्हा बँक कॉलनी येथे चेतन लीलाधर पाटील हा तरुण वास्तव्यास आहे. ३१ मे रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास चेतन हा गुजराल पेट्रोलंपप परिसरात आला होता, यादरम्यान याठिकाणी असलेल्या गुरुकृपा मेडीकलच्या समोर त्याची एम.एच. १९ सी.जी. २७०५ या क्रमाकांची दुचाकी उभी केली. साडेआठ वाजता चेतन काम आटोपून परतला असता, अवघ्या १५ मिनिटात त्याची दुचाकी जागेवर दिसून आली नाही. सर्वत्र शोध घेतला मात्र दुचाकी सापडली नाही, अखेर सोमवार, ५ जून रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सपकाळे हे करीत आहेत.