Home Cities जामनेर यूपीएससी परीक्षेत यश मिळविलेल्या सागर देठे यांचा नागरी सत्कार

यूपीएससी परीक्षेत यश मिळविलेल्या सागर देठे यांचा नागरी सत्कार


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील निमखेडी या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या सागर शामराव देठे याने लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या यूपीएससी परीक्षेमध्ये ६९१ रँक मार घेऊन उत्तीर्ण झाला असून जिल्हा परिषद शाळेत शिकलेला मुलगा हा आज देशातल्या सर्वोच्च असलेल्या परीक्षेत पास झाला आहे. याच्या गौरव करण्यासाठी निमखेडी गावातील ग्रामस्थांनी सागर देठे यांची गावातून ढोल ताशा व डीजेच्या तालावर मिरवणूक काढली.

त्याचबरोबर भव्य असा नागरिक सत्कार यावेळी करण्यात आला या कार्यक्रमाला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन माजी उपाध्यक्ष दिलीप खोडते भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर डिके पाटील संजय गरुड राजमल भागवत उदय पाटील स्वप्निल पाटील यांच्यासह पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound