जळगाव प्रतिनिधी । नागपूर येथून दुचाकी चोरून जळगाव शहरात वापरत असलेल्या चोरट्यास दुचाकीसह सिंधी कॉलनीतून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. तरूणकुमार क्रिष्णाकुमार धर्मे वय-28 रा. मेडीकल हॉस्पिटल नागपूर यांची 20 ऑगस्ट 2018 रोजी मेडीकल हॉस्पिटल नागपूर येथील डॉक्टर व स्टॉप पार्कींगमधून बजाज पल्स मोटार सायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी डॉ. धर्मे यांच्या फिर्यादीवरून अजनी (नागपूर) पोलीस स्टेशनला दुचाकी चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, चोरी गेलेली दुचाकी जळगाव शहरातील एका व्यक्तीकडे असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी पथक तयार करून पथकातील पोहेकॉ रविंद्र पाटील, विनोद पाटील, अनिल देशमुख, इंद्रिस पठाण, अशरफ शेख यांनी तपास करून संशयित आरोपी कमल गोपीचंद प्रेमचंदाणी वय-24 रा. सिंधी कॉलनी याला ताब्यात घेतले. दुचाकीबाबत अधिक चौकशी केली असता त्याचे नागपूर येथे दाखल असलेल्या दुचाकी चोरी गुन्ह्याची कबुली दिली आहे. संशयित आरोपीस अधिक चौकशीसाठी अजनी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.