चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील कन्नड घाटातील एका वळणावर अपघातात गंभीर जखमी झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, छत्रपती संभाजीनगरातील वडगाव कोलाठी येथील आनंदराव पाटील (वय-४२) हे वरील ठिकाणी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. २० मे रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पाटील हे आपल्या दुचाकीवरून (क्र. एम.एच. २० जी.एल ११७१) छत्रपती संभाजीनगराकडे जात होते. मात्र कन्नड घाटातील सरदार पॉईंटच्या मोठ्या वळणावर भरधाव वेगाने ओव्हरटेक करणाऱ्या आयशरने (क्र. टी.एस.१५ युडी ०११८) दुचाकीला जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात आनंदराव पाटील यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना लागलीच औषधोपचारासाठी हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात आयशर वरील चालक सल्लाउद्दीन समद कारभारी (वय-२८) रा. लामजावा जि. लातूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.