रावेर पिपल्स बँकेत ‘लोकमान्य’ पॅनलचे देखील उमेदवार जाहीर

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील रावेर पीपल्स बँकेच्या निवडणुकीत सहकार पाठोपाठ आता लोकमान्य पॅनलचे देखिल उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. दि २९ मे माघारीची तारीख असून दहा जुनला मतदान होणार आहे.

 

 

रावेर पिपल्स बँकेच्या पंचवर्षिक निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. काल सहकार पॅनलने उमेदवार जाहीर केल्यानंतर आज लोकमान्य पॅनेलचे उमेदवारी जाहीर करण्यात आले आहेत.  लोकमान्य पॅनल मध्ये ओबीसी मतदार संघात भाजपाचे शहराध्यक्ष दिलीप हीरामण पाटील, जनरल मतदारसंघात प्रल्हाद रामदास महाजन,  संजय गंगाधर वाणी, सोपान साहेबराव पाटील, विनायक सिताराम पाटील, पितांबर रामभाऊ पाटील, राजेश सुधाकर शिंदे, मानस अरुण कुलकर्णी, रविंद्र प्रभाकर महाजन, महीला राखीव मतदारसंघ योगिनी राजेश पाटील, शैलजा अशोक महाजन भटक्या विमुक्त जाती जमाती ऍड प्रविण सुपडू पाचपोहे, अनुसूचित- जाती- जमाती राखीव मतदारसंघ विकास (मिलिंद) वामन अवसमल हे उमेदवार असणार आहेत.

 

ओबिसी मतदारसंघात लक्षवेधी लढत

 

रावेर पिपल्स बँकेच्या पंचवर्षिक निवडणुकीत ओबिसी मतदारसंघात सर्वात तगडी व लक्षवेधी लढत होणार आहे. कॉग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन विरुध्द लोकमान्य पॅनलने भाजपा शहराध्यक्ष दिलीप हिरामन पाटील यांना रिंगणात उतरवले आहे.या लढतीकडे रावेर शहरासह तालुक्याचे लक्ष असणार आहे.

Protected Content