नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मान्सून केरळ आणि लक्षद्वीपमध्ये धडकला आहे. कर्नाटकच्या किनारपट्टीवरही पावसाला सुरूवात झाली असून आता लवकरच पाऊस महाराष्ट्रातही बरसेल, अशी माहिती स्कायमेटने दिलीय.
येत्या आठ ते दहा तासात सोसाट्याच्या वाऱ्यासह अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, गोंदिया, कोल्हापूर, नागपूर, परभणी, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा या शहरांमध्ये पाऊस होईल, अशी शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. दरम्यान देशात यंदा सरासरी ९६ टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.