Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगरला शिवसेनेतर्फे जल्लोषात ना. महाजन यांचे अभिनंदन

मुक्ताईनगरला शिवसेनेतर्फे जल्लोषात ना. महाजन यांचे अभिनंदन

0
60
muktainagar shivsena celebration

muktainagar shivsena celebration

मुक्ताईनगर प्रतिनिधी । ना. गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर येथील शिवसेनेतर्फे जोरदार आतषबाजी करून आनंद साजरा करण्यात आला.

येथील प्रवर्धन चौकात शिवसेनेतर्फे फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच शहरात नामदार महाजन यांच्या शुभेच्छांबद्दल चे वार्ताफलक चौकात लावण्यात आले. या प्रसंगी तालुकाप्रमुख छोटू भोई सुनील पाटील राजेंद्र हिवराळे, राजेंद्र तळेले, विठ्ठल तळेले, प्रफुल्ल पाटील, गणेश डांगे, प्रवीण चौधरी, योगेश काळे, वसंत बनवले, बबलू वंजारी, रोहिदास शिरसाठ, शुभम तळेले, शुभम शर्मा, पवन सोनवणे, पंकज कोळी, जिवराम कोळी, पप्पू मराठे, राजपूत अनिकेत, गौरव तळले यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

मुक्ताईनगरात भाजप आणि शिवसेनेत प्रचंड धुम्मस आहे. दोन्ही पक्ष कायम एकमेकांशी संघर्षाच्या पवित्र्यात असतात. या पार्श्‍वभूमिवर, ना. गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रीपदाचा आनंद शिवसेनेने जोरदार व्यक्त करून स्थानिक भाजप नेते आणि पदाधिकार्‍यांना खिजवले असल्याचे मानले जात आहे. याचा आगामी राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound